Belagavi

हॅटट्रिक हिरो शिवराजकुमार उद्या लक्ष्मी हेब्बाळकरांच्या प्रचारासाठी येणार

Share

कन्नड चित्रपट अभिनेता हॅटट्रिक हिरो शिवराजकुमार उद्या 6 मे रोजी बेळगावात येणार आहेत. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारात ते सहभागी होणार आहेत.

दुपारी 4 वाजता ते बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे पोहोचतील, तेथे श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधून निवडणूक प्रचाराच्या कामाला सुरुवात करतील.
5 वाजता ते शिंदोळी गावात रोड शो करतील आणि प्रचार सभेला संबोधित करतील. सायंकाळी 7 वाजता होन्निहाळ गावात ते रोड शो करणार आहेत.

Tags: