केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आज सुदैवानेच भयानक अपघातातून बचावले. त्यांच्या हेलिकॉप्टरला पक्षाने धडक दिल्याने खिडकीच्या काचा फुटल्या. त्यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीला अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे राज्यातील नेते जोरदार प्रचारात गुंतले आहेत. त्याचप्रमाणे आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर डी.के. शिवकुमार मुलुबागिली येथे प्रचाराला जाण्यासाठी जक्कुर येथून निघाले. मात्र होस्कोटेजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला पक्षाची धडक बसली. यामुळे पायलट शेजारील खिडकीच्या काचा फुटल्या. त्यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
एचएएल विमानतळावर शिवकुमार ज्या हेलिकॉप्टरने येथून मुलुबगिलीला जात होते त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. उड्डाण दरम्यान हेलिकॉप्टरच्या पुढील खिडकीच्या काचा फुटल्या. डीके शिवकुमार बचावले आहेत. घटनेनंतर शिवकुमार एचएएल विमानतळावरून परतले.


Recent Comments