विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.
ते आज बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील दोड्डबळ्ळापूर तालुक्यातील घाटी देवालयात देवदर्शन घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. बोम्मई म्हणाले, आज या देवालयात दर्शन घेऊन राज्यातील जनतेला सुख,समाधान, शांती लाभू दे अशी प्रार्थना केली आहे.
बोम्मई पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हताश झाले आहेत. शेवटची निवडणूक 2013 मध्ये झाली होती. 2018 मध्ये पुन्हा निवडणूक लढवली. आता पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहतायेत. एखादी व्यक्ती मुख्यमंत्री झाली हे महत्त्वाचे नाही. मुख्यमंत्री म्हणून ते राज्यातील जनतेसाठी काय करू शकतात, हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. वरुणा आणि कोलारमधून ते निवडणूक लढवणार आहेत. 2018 मध्ये लोकांनी त्यांना नाकारले आणि यावेळीही नाकारतील असा दावा त्यांनी केला. वरुणामध्ये आम्ही प्रबळ उमेदवार देऊ. पुत्र विजयेंद्र यांनी तेथून निवडणूक लढवावी अशी येडियुरप्पांची इच्छा आहे. अंतिम निर्णय येडियुरप्पा आणि पक्ष संसदीय मंडळ घेईल. असे ते म्हणाले. बाईट
यावेळी काँग्रेसला बहुमत मिळेल असा निष्कर्ष निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून आल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी हे सर्व्हे खूप जुने आहेत, आता चित्र बदलल्याचे सांगितले. सध्या जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने नाही. निवडणुकीला अजून दीड महिना बाकी असून अनेक बदल होताना दिसत आहेत. भाजप स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर येईल, असे ते म्हणाले.
उमेदवार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती आणखी आठवडाभरात प्रसिद्ध होईल, असे ते म्हणाले. संभाव्य उमेदवारांबाबत अभिप्राय मेळाव्याच्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले की, तळागाळातील पदाधिकाऱ्यांचे अभिप्राय संकलित केले जात असून, जिल्हा व तालुका पातळीवर चर्चा करून ते संसदीय मंडळाकडे सादर केले करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
आरक्षण ही निवडणूक नौटंकी असल्याच्या विरोधी पक्षांच्या दाव्याला उत्तर देताना, ते सत्तेवर असताना हे करू शकले असते. ही तीस वर्षांची मागणी आहे. वचनबद्धतेच्या अभावामुळे त्यांनी ते साहस केले नाही. केवळ लोकांकडे व्होट बँक म्हणून पाहिले. त्यांच्यासाठी आम्ही अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. त्यामुळे त्यांनी गदारोळ सुरू केला असून, ते कोणत्याही परिस्थितीत राजकारण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट
एकंदर, राज्यात भाजप पुन्हा स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत येईल असा आत्मविश्वास मुख्यमंत्री बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments