बेळगाव येथे झालेल्या राहुल गांधींच्या सभेनंतर गावी परतणाऱ्या वृद्धाचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
धारवाड तालुक्यातील तेगूर जवळील मुल्ला ढाब्याजवळ काँग्रेसची सभा संपवून जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडताना कारने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अब्दुल खादर मुजाती, वय 70, रा. एस.एम. कृष्णा नगर, हुबळी असे या वृद्धाचे नाव आहे.
तो इतर कार्यकर्त्यांसमवेत क्रूझरने गावी जात होता. जेवणासाठी ढाब्यावर जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात कारने त्याला धडक दिली. त्यामुळे अब्दुलचा जागीच मृत्यू झाला. गरग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन फिर्याद नोंदवली.


Recent Comments