Dharwad

नरेगा मजुरांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिन

Share

धारवाड तालुक्यातील देवरहुबळ्ळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुरकट्टी गावात नरेगा योजनेंतर्गत काम करणाऱ्या महिला मजुरांसोबत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला.

या महिला मजुरांना ग्राम पंचायतीच्या वतीने महात्मा गांधी यांचे चित्र व नरेगाचा लोगो असलेल्या टी-शर्टचे वाटप करण्यात आले. महिलांना गांधी टोपीही देण्यात आली. याशिवाय महिला दिनानिमित्त नरेगा महिला मजुरांच्या हस्ते केक कापण्यात आला. ग्रामपंचायत सदस्या गीता आयती यांच्या नेतृत्वाखाली महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमानंतर महिला मजुरांनी पुन्हा कामावर हजर राहून आपल्या शिस्तीचे दर्शन घडवले.

Tags: