Dharwad

11 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आयआयटी इमारतीचे करणार उद्घाटन

Share

धारवाड तालुक्यातील मुम्मीगट्टीजवळील विस्तीर्ण परिसरात उंच उभ्या असलेल्या सुंदर आयआयटी इमारतीचे उद्घाटन ११ मार्च रोजीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. आयआयटीची इमारत उद्घाटनासाठी तयार आहे. या उद्घाटन सोहळ्याला सुमारे १ लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, आमदार अरविंद बेल्लद , अमृता देसाई, महापौर इरेशा अंचटगेरी यांच्यासह अनेकांनी आयआयटी इमारतीला भेट देऊन पाहणी केली. आयआयटी इमारतीत आणखी किरकोळ कामे प्रलंबित असून ती 11 मार्चपर्यंत पूर्ण होतील. आयआयटी इमारतीच्या शेजारी पंतप्रधानांच्या व्यासपीठाचा कार्यक्रम होणार असून त्याच दिवशी पंतप्रधान राज्य सरकारच्या विविध कामांचे भूमिपूजन करणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

Tags: