माजी मुख्यमंत्री एच .डी. कुमारस्वामी यांनी धारवाड शहरातील महानगरपालिकेच्या आवारात सुरू असलेल्या उपोषणाच्या 16 व्या दिवशी , आंदोलकांना पाठिंबा दिला.

महापालिकेतून गेली 15-20 वर्षे सेवा बजावणाऱ्या आणि अचानकपणे काढून टाकलेल्या 358 पाणीपुरवठा कर्मचार्यांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी तसेच आठ महिन्यांचा थकीत पगार देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी भेट दिली. आणि आंदोलकांना आपला पाठिंबा दर्शवला .



Recent Comments