माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्या निषेधार्थ गोकाक येथे ब्राह्मण समाजातर्फे आंदोलन छेडण्यात आले.

ब्राह्मण समाजाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ गोकाक येथे ब्राह्मण समाजातर्फे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी बसवेश्वर सर्कलमध्ये मानवी साखळी तयार करून निषेध व्यक्त केला. कुमारस्वामींच्या चित्राला आग लावून निदर्शकांनी संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना पवन जोशी म्हणाले की, जो ब्राह्मण समाजाचा अपमान करेल त्याचा नाश होईल यात शंका नाही. आम्ही ब्राह्मण सुसंस्कृत आणि शांतताप्रिय लोक आहोत, आमची कितीही मठ असले तरी आमच्यासाठी ते एक आहेत. कुमारस्वामींनी व्होट बँकेसाठी समाजात विष पेरण्यासारखे विधान करू नये. ब्राह्मणांचा शाप तुम्हाला सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
बसवेश्वर सर्कल ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून निवेदन देण्यात आले. ब्राह्मण समाजाच्या विरोधात बोलणाऱ्या राजकीय नेत्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा अशी मागणी त्यात केली आहे.
यावेळी ब्राह्मण समाजाचे नेते बी. के. जोशी, हणमंत देशपांडे, पवन जोशी, प्रसन्न कुलकर्णी, कविता बडागंडी, भारती हंडीगोळा, मंजुळा कुलकर्णी आदी उपस्थित होते.


Recent Comments