धारवाड येथील कमलापूर येथे शेडला अचानक लागलेल्या आगीत शेडमधील बैल होरपळून ठार झाला तर, साठवलेले धान्य व साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
कमलापूर येथील बसप्पा कमती यांच्या मालकीच्या शेडला अचानक आग लागली. बसप्पा कमलापूरच्या शिवारात शेड बांधून तेथे बैल बांधायचे. तसेच, याच शेडमध्ये त्यांनी 25 पोती सोयाबीनचा साठा केला होता. मात्र, काल रात्री या शेडला अचानक आग लागून एक बैल जिवंत जळून खाक झाला. तसेच, साठवलेलं धान्य आणि अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. उपनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments