Dharwad

धारवाड जिल्हा ग्राहक मंचाचा “स्पाइस जेट”ला दणका; 63,457 रुपयांचा ठोठावला दंड !

Share

धारवाड जिल्हा ग्राहक रक्षण मंचाने स्पाइस जेट एअरवेज कंपनीला सेवेत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर 63,457 रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश जारी केला आहे.

धारवाड येथील शकील मुल्ला नावाच्या व्यक्तीने २०२१ मध्ये हैदराबादहून बेळगावला येण्यासाठी स्पाइस जेटचे तिकीट काढले होते. शकील एक तास लवकर हैदराबाद विमानतळावर पोहोचला. पण स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांनी त्याला विमानात चढू दिले नाही.

त्यानंतर शकील मुल्ला यांनी स्पाईस जेट एअरवेजच्या विरोधात धारवाड जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करून घेत ग्राहक मंचाने सखोल तपास केला. या प्रकरणात स्पाइस जेट एअरवेजच्या सेवेत निष्काळजीपणा व कमतरता आढळून आली. त्यामुळे शकील मुल्ला यांची तक्रार योग्य ठरवण्यात आली. त्यांना तिकीट शुल्क आणि 50,000 रुपये दंड असे एकूण 63,457 रुपये महिनाभरात परत करण्याचा आदेश धारवाड जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे. यासंदर्भात शकील मुल्ला यांनी ‘आपली मराठी’ला अधिक माहिती दिली.

Tags: