Dharwad

धारवाडमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी जप्त

Share

सायलेन्सरद्वारे मोठा कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर कठोर कारवाईची धडक मोहीम धारवाड वाहतूक पोलिसांनी सुरु केली आहे.

स्पोर्ट्स बाइक्सना कर्कश आवाजाच्या सायलेन्सरवर बंदी घातली असली तरी धारवाडमध्ये अनेकजण अशा प्रकारच्या सायलेन्सरने मोठा आवाज करत दुचाकी चालवतात. पोलिसांनी अशा चार दुचाकी जप्त केल्या आहेत. अशा दुचाकी चालवताना आढळल्यास त्याही जप्त केल्या जातील, असा कडक इशारा वाहतूक पोलीस स्थानकाचे निरीक्षक मल्लनगौडा नायकर यांनी दिला आहे.

Tags: