Dharwad

निर्मला सीतारामन यांनी धारवाडची कसुती साडी परिधान करून केला अर्थसंकल्प सादर

Share

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी धारवाडमधून भरतकाम केलेली साडी परिधान करून अर्थसंकल्प सादर केला हे विशेष.

सीतारामन यांनी परिधान केलेल्या , धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद एम्ब्रॉयडरी आर्ट असलेल्या लाल (मरून कलरची) साडीने देशाचे लक्ष वेधून घेतले . या साडीवरील भरतकाम धारवाड शहरातील आरती हिरेमठ यांच्या मालकीच्या आरती क्राफ्ट मध्ये महिलांनी स्वतः केले होते .
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एका कार्यक्रमात मंत्री निर्मला सीतारामन यांना नवलगुंद भरतकाम कला आणि सांस्कृतिक समृद्धीबद्दल माहिती दिली आणि या धारवाड जिल्ह्याच्या साड्या भेट म्हणून दिल्या.

जिल्हाधिकारी गुरुदत्त हेगडे यांनी हातमाग व वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी सय्यद नईम अहमद यांच्यामार्फत भरतकाम तज्ञांची ओळख करून त्यांना भरतकाम केलेल्या साड्या तयार करण्याच्या सूचना दिल्या.आरती क्राफ्टच्या मालक आरती हिरेमठ यांनी भरतकामाला आनंदाने सुरुवात केली.

गेल्या 32 वर्षांपासून भरतकामाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आरती यांनी सुमारे 210 महिलांची टीम तयार केली असून, त्यांना भरतकामाचे आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या मागणीनुसार, तिने आज परिधान केलेल्या लाल (मरुण) रंगाच्या साडीसह पारंपारिक धारवाड भरतकामासह हातमाग इलकल्ल सिल्क साड्या पाठवल्या होत्या. पाच मीटर लांबीच्या इलकल्ल साडीवर नाजूक नक्षी असून थेरू, गोपुरम, मोर आणि कमळ यांच्या प्रतिमांवर नक्षीकाम करण्यात आले आहे. नुकतेच हुबळी रेल्वे मैदानावर झालेल्या युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच कसुती केंद्रातील रेशमी शाल भेट देण्यात आली होती . आपल्या केंद्रातील साडी परिधान केल्याबद्दल , अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे आरती यांनी आभार मानले आहेत .

Tags: