वाहतूक कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला धारवाड जिल्हा न्यायालयाने शिक्षा जाहीर केली असून आरोपीला एक वर्ष कारावास आणि 5000 दंडाची शिक्षा सुनावली आहे.
2016 साली , लक्ष्मण मोरब नावाच्या व्यक्तीने धारवाड कृषी विद्यापीठाजवळ एका परिवहन बस चालकावर क्षुल्लक कारणावरून हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर बसचालकाने धारवाड उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
आरोप सिद्ध झाल्यानंतर धारवाड जिल्हा न्यायालयाने लक्ष्मण मोरब या आरोपीला एक वर्षाची साधी कैद व पाच हजार दंड भरण्याचे आदेश दिले.


Recent Comments