Dharwad

मोदींच्याहस्ते शनिवारी हुबळीत युवा महोत्सवाचे उद्घाटन; आयआयटीचे इतक्यात नाही

Share

हुबळी आणि धारवाड येथे १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मोदींच्या हस्ते आयआयटीचे उद्घाटन रद्द करण्यात आले असून, त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येतील असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

शुक्रवारी धारवाड येथील सृजन रंगमंदिरमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. जोशी म्हणाले,
पंतप्रधान मोदी युवा महोत्सवाचे उदघाटन करून हुबळीतुन परत जाणार आहेत. हा युवा महोत्सव तरुणाईशी संबंधित आहे. त्यासाठी तरुणांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. युवकांनी स्वतः पास मिळवावे. पास असणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल.

विविध शहरातून येणाऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यासाठी पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातून सुमारे सात ते आठ हजार युवक या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कलात्मक प्रतिभा, साहसी खेळ, देशी खेळ यावरही भर दिला जाईल. ही पंतप्रधानांची संकल्पना आहे. युवा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे प्रेरक भाषण होईल. हा युवजनोत्सव कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. त्यासाठी शिक्षकांनी महाविद्यालयांतून विद्यार्थी पाठवावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, आमदार अरविंद बेल्लद, सी. एम. निंबन्नवर, माजी आमदार सीमा मसूती, जिल्हाधिकारी गुरुदत्त हेगडे, जिल्हा पोलीस अधीक्षक लोकेश जगलासर आदी उपस्थित होते.

Tags:

pralhad-joshi-webite-inauguration/