Dharwad

हुबळी धारवाड मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या

Share

हुबळी धारवाड या जुळ्या शहरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी हुबळी धारवाड महानगर पालिकेच्या आवारात आम आदमी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर पक्षनेत्यांनी सांगितले की, गेल्या २-३ महिन्यांपासून हुबळी धारवाड या जुळ्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
या शहरातील पाण्याचा प्रश्न सुटला नसून दिवसेंदिवस समस्या गंभीर होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पाण्याच्या समस्येमुळे या शहरातील नागरिकांचा संयम सुटला असून, आगामी काळात तीव्र संघर्ष सुरू करण्यापूर्वी पाण्याची समस्या सोडवावी व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनंतकुमार बुगडी, विकास सोप्पीन आदी उपस्थित होते.

Tags: