Vijayapura

विजापूरमध्येही मांदोसचा इफेक्ट : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Share

विजापूरमध्येही मांदोस वादळाचा इफेक्ट झाला आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून थंड वारे वाहत असून आजच्या मुसळधार पावसामुळे कामावर जाणाऱ्यांची अडचण झाली आहे.

ऐन हिवाळ्यात रेनकोट आणि छत्र्या पुन्हा बाहेर पडल्या आहेत. प्रतिकूल हवामानामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती लोकांमध्ये पसरली आहे. तर दुसरीकडे पावसाने द्राक्ष व आंबा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकंदर या वादळामुळे विजापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असून त्याने जनजीवन विस्कळीत केले आहे.

Tags:

mandous-effect-at-vijayapura/