DEATH

कर्नाटकात थंडीच्या लाटेचा विजापूर जिल्ह्यात पहिला बळी

Share

कर्नाटकात यंदा थंडीच्या लाटेचा पहिला बळी विजापुरात गेला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मुद्देबिहाळ शहरात एका वृद्धाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे विजापूर जिल्ह्यात जनजीवन गारठले आहे. तशातच मुद्देबिहाळ शहरातील बसवेश्वर सर्कलमध्ये 75 वर्षीय भीमप्पा हादिमनी यांचा मृत्यू झाला. शहरातील नेताजी नगर येथील रहिवासी भीमप्पा हादिमनी या वृद्धाचा मृतदेह नवरत्न बारसमोर आढळून आला. कडाक्याच्या थंडीमुळे मुठी आवळलेल्या आणि गुडघ्यावर पालथा झोपलेल्या अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला आहे. मुद्देबिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करून गुन्हा दाखल केला.

Tags:

due-to-cold-climate-old-aged-person-death/