Dharwad

काँग्रेसच्या सत्ताकाळात होतात हिंदू-मुस्लिम दंगली : जगदीश शेट्टर

Share

ज्या वेळी काँग्रेसचे सरकार सत्तेत असते, तेव्हा हिंदू-मुस्लिम दंगली होतात, असे म्हणत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

हुबळीत आज सोमवारी पत्रकारांशी बोलताना शेट्टर म्हणाले की, ‘सिद्धरामय्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत टिपू सुलतानची पूजा करतात’, असे सी. टी. रवी यांनी म्हटले आहे, त्यात काहीही गैर नाही. टिपू सुलतानचे समर्थन करत आरएसएसवर टीका करणे हा सिद्धरामय्या यांचा स्वभाव असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात काँग्रेसची सत्ता असताना हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात हत्या झाल्या.

 

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर हिंदू-मुस्लिम दंगली थांबल्या. काँग्रेसची सत्ता असताना देशात हिंदू-मुस्लिम दंगली होतात, असे सी. टी. रवी यांनी म्हटले आहे. वक्कलिगा समुदायातून मुख्यमंत्री होण्याची डी. के. शिवकुमार यांची इच्छा आहे. सत्तेच्या आशेने त्यांनी ही मागणी केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस कोणत्याही व्यासपीठाचा गैरवापर करते. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्दू यांनी गोंधळ घातल्याने काँग्रेस नेस्तनाबूत झाली. तसेच कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्यामुळे काँग्रेस कमकुवत झाली आहे. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यातील लढतीमुळे ती नेस्तनाबूत होईल असे भाकीत जगदीश शेट्टर यांनी वर्तविले.

Tags:

JAGDISH SHETTAR