Banglore

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याचे श्रेय नेहरूंना : मुख्यमंत्री

Share

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने नेतृत्व करण्याचे श्रेय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जाते, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसौधसमोर त्यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. फ्लो
त्यानंतर बोलताना बोम्मई म्हणाले, आज आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा महात्मा गांधींशी जवळचा संबंध होता आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून काम केले. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक विकास कार्यक्रमांची पायाभरणी केली. त्यांनी जनरल किटो सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर अलिप्त राष्ट्र चळवळीसाठी केलेले काम अप्रतिम आहे. या चळवळीच्या माध्यमातून भारत आपली आघाडीची भूमिका बजावत आहे. . त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून सार्थपणे साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट
मंत्री हालप्पा आचार, मुख्य सचिव वंदिता शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

Tags:

CM BOMMAI CHILDRENS DAY