बेळगाव शहरात उत्पादन शुल्क आयुक्तांच्या नेतृत्वाखाली बेळगाव विभागीय तीन दिवसीय अबकारी क्रीडास्पर्धांचे आज उदघाटन करण्यात आले.

अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त शेख तन्वीर आसिफ यांनी तीन दिवसीय अबकारी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. या सोहळ्याला विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धा 11, 12, 13 नोव्हेंबर अशा तीन दिवस चालणार असून त्यात बेळगाव, होस्पेट, गुलबर्गा या तीन उत्पादन शुल्क विभागातील शेकडो स्पर्धकांनी या क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आहे.


यावेळी बोलताना बेळगावचे उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त मंजुनाथ म्हणाले की, विभागीय कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. यात विविध वैयक्तिक आणि सांघिक खेळ होत आहेत आणि एकूण 16 महसूल जिल्ह्यांमधून सुमारे 1000 स्पर्धक सहभागी होत आहेत. धावणे स्पर्धा, जलतरण स्पर्धा, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आदी विविध क्रीडा प्रकारांत स्पर्धा सुरू असून विजेत्यांना उत्कृष्ट बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी एकलव्य पुरस्कार विजेते राष्ट्रीय बॉक्सर मुकुंद किल्लेकर, उत्पादन शुल्क विभागाचे तीन उपायुक्त, कर्मचारी, स्पर्धक आदी उपस्थित होते.


Recent Comments