Hukkeri

हुक्केरी येथे संत कनकदास जयंती साजरी

Share

हुक्केरी शहरात कनकदास जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. हुक्केरी शहरातील अडवी सिद्धेश्वर मठाच्या प्रांगणात हुक्केरी चंद्रशेखर महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात नगरपालिका अध्यक्ष अण्णाप्पा पाटील व हालमत समाजाचे नेते शंकरराव हेगडे यांच्याहस्ते संत कनकदास प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामींनी संत कनकदास यांच्या भक्तितत्वाविषयी माहिती देत आज संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तिभावात कनकदास जयंती साजरी करण्यात येत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील जयंती कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी तालुका प्रशासन कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, समाजातील नेते डॉ. जयप्रकाश करजगी, डॉ. शिवाजी गोटुरी यांनी कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

विविध विभागाचे अधिकारी आणि हालमत समाजाच्या नेत्यांच्या उपस्थितीत तालुका प्रशासनाच्या वतीने संतश्रेष्ठ कवी भक्त कनकदास यांची जयंती अर्थपूर्णरीत्या साजरी केली जात आहे, असे तहसीलदार म्हणाले.

यावेळी या परिसरात मिरवणुकीचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी नागाप्पण्णा करजगी, भीमाप्पा रामगोनहट्टी, गजानन कोळ्ळी, शंकरराव हेगडे, सिद्धू ढवळेश्वर, वकील भीमसेन भागी, भारमा पुजेरी, हुक्केरी नगरपालिका सदस्य, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते..

Tags:

kanakdas-jayanti-in-hukkeri/