Udupi

सिध्दरामयांनी कुणाला मोठं होऊ दिलं नाही : मुख्यमंत्री

Share

कर्नाटकातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील डबल इंजिन सरकार सातत्याने काम करत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.

उडुपी जिल्ह्यातील कापू विधानसभा मतदारसंघात भाजपने आयोजित केलेल्या जनसंकल्प यात्रेचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने किनारी प्रदेशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. सीआरझेडच्या नियमात सुधारणा करण्यात आली असून, अनेक दिवसांपासून तटरक्षकांची मागणी होती. सागरमाला प्रकल्पाला १७७४ कोटींचे अनुदान देऊन सर्वसमावेशक विकासावर भर दिला असल्याचे ते म्हणाले.

सामाजिक न्याय हा आजचा चर्चेचा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष केवळ भाषणबाजीने समाजाला पोसत आहे. सिद्धरामय्यांसारख्या नेत्यांनी सामाजिक न्यायाच्या नावाखाली स्वत:ची प्रगती केली मात्र त्यांनी कुणालाही मोठं होऊ दिलं नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी डबल इंजिन सरकार सतत काम करत आहे. मच्छीमारांना लागणारे अतिरिक्त रॉकेल उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल आणि मच्छीमारांसाठी सुसज्ज घरे बांधण्याचे काम सुरू असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.

यावेळी माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, मंत्री गोविंद कारजोळ, कोटा श्रीनिवास पुजारी, व्ही. सुनील कुमार, केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे, आमदार लालजी मेंडन, रघुपती भट आदी उपस्थित होते.

Tags:

cm-bommai-jana-sankalp-yatre/