बेळगाव जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करणे आणि डिजिटलायझेशनच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रविवार रात्रीपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

प्रगती आढावा बैठकीत त्यांनी संथ गतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली असून सुट्टीच्या दिवशीही फील्डवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात एकूण ४१ लाख ७ हजार अर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून गेल्या काही दिवसांत केवळ ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. बेळगाव उत्तर, अथणी आणि कडावड या भागात कामगिरी अत्यंत सुमार असल्याने येथील बीएलओ कर्मचाऱ्यांनी शनिवार व रविवारी सुट्टी न घेता ॲपवर माहिती अपलोड करावी आणि डिजिटलायझेशनचे काम पूर्ण करावे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले आहे.


Recent Comments