गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील जोडकुरळी गावात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.

हे घर गावकरी गंगाव्वा वराळे यांच्या मालकीचे असून सततच्या पावसामुळे भिंती पूर्णपणे कमकुवत झाल्या होत्या. घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करत होते. त्याच वेळी अचानक भिंत कोसळू लागली.

भिंत कोसळत असल्याचा अंदाज येताच घरातील सातही जणांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वांचे प्राण सुखरूप वाचले. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असून गरीब कुटुंब बेघर झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
डी. के. उप्पार
इन् न्यूज, चिक्कोडी.


Recent Comments