Belagavi

बेळगावचे राजकारणी भ्याड असल्याचा नारायणगौडांचा आरोप

Share

बेळगावमध्ये कन्नडच्या अस्तित्वासाठी केवळ कन्नड संघटनाच लढत असून, कन्नड भाषेबाबत बेळगावमधील राजकारणी भ्याड असल्याचा आरोप करवेचे राज्याध्यक्ष टी ए नारायणगौड यांनी केलाय.

शनिवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र बसवरील मराठी फलकावरून राजकारण्यांना त्यांनी लक्ष्य केले असून कर्नाटकातील बसवरील पाट्या मराठीत असतात मात्र महाराष्ट्राच्या बसवर मराठीत पाटी असते यावर राजकारणी कधीच आवाज उठवत नसल्याचे ते म्हणाले. याबाबत बेळगावमधील राजकारणी किंवा संघटना सरकारवर दबाव आणत नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

कल्याण कर्नाटकाचा पुन्हा एकदा रौप्य महोत्सव साजरा करण्याचा निर्धार मध्यवर्ती समितीने घेतला असून उत्तर कर्नाटकात जर हा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरले तर बेळगावमध्ये किंवा इतर ठिकाणी करण्याचे ठरल्यास कलबुर्गी येथे हा कार्यक्रम आयोजिला जाईल, बेळगावमध्ये यंदाचा राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा झाल्याचे नारायनगौडा म्हणाले. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र किंवा कर्नाटकात महत्वाच्या ठिकाणी त्या त्या भाषा वापरण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून आता यावर सरकार कोणते निर्णय घेते हे पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कन्नड समर्थक संघटना बेंगळुरूपुरत्या मर्यादित आहेत आणि बेळगावमधील कन्नड संघटनांना सरकार अनुदान का देत नाही या प्रश्नावर देखील त्यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्र एकीकरण समितीवरून महाराष्ट्र सरकारला टोला लगावला. बेळगावमधील राज्योत्सवासंदर्भात प्रशासनाने लागू करण्यात आलेल्या अटींबाबत बोलताना त्यांनी स्थानिक नेत्यांकडे बोट दाखवत, याबाबत स्थानिक नेत्यांनीच उत्तर द्यावे असे सांगितले. कन्नडिगांच्या उत्सवात लादण्यात येत असलेल्या अटींवर खुल्या पद्धतीने कोणतेही राजकारणी बोलत नसून येथील राजकारणी भ्याड असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी करवे संचालक महादेव तळवार, करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनहट्टी, नेते महेश हट्टीहोळ, रुद्रगौड पाटील, रमेश यरगण्णवर आदी उपस्थित होते.

Tags:

krv narayangouda againt karnataka goverment