२०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची थकीत शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी या मागणीसाठी अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगावात निदर्शने केली.
लाखो गरीब आणि हुशार विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात आणि शिष्यवृत्तीचे पैसे त्यांच्या शिक्षणाला पूरक म्हणून वापरतात. मात्र अर्ज सादर केल्यानंतर या सॉफ्टवेअरमध्ये शिष्यवृत्ती जाहीर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी. तसेच शिष्यवृत्ती घोटाळ्याबाबत योग्य ती चौकशी करण्याची मागणी करत, शुक्रवारी अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगाव येथील डीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले.

यावेळी बोलताना अभाविपचे राज्य कार्यकारिणी सदस्य किरण दुकानदार म्हणाले, शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी अर्ध्यावरच महाविद्यालय सोडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे थकीत शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांचे हित जपावे, एनइपी लागू केलेली सर्व विद्यापीठे वापरत असलेल्या सॉफ्टवेअर मध्ये येत असलेल्या अडचणींमुळे यावर तोडगा काढून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी अभाविपचे पदाधिकारी रोहित उमनाबादीमठ, संदीप दंडगल, रोहित अलकुंटे, प्रीतम उपरी यासह अनेक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments