Belagavi

अंगणात लाटणे, मुसळ केले उभे; बेळगावात ग्रहण काळात परंपरांची पाळणूक

Share

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज भारतात सुमारे 2 तास दिसले. देशाच्या बहुतांश भागात हे ग्रहण पाहता आले. बेळगावात हिंदु धार्मिक परंपरेप्रमाणे ग्रहण काळात अंगणात मुसळ किंवा लाटणे उभे करून ठेवत पारंपरिक प्रथांची जोपासना करण्यात आली.

देशाच्या बहुतांश भागात हे ग्रहण पाहता आले. अमृतसरमध्ये संध्याकाळी 4.19 वाजून ते देशात पहिल्यांदा दिसले. त्याचवेळी मुंबईत संध्याकाळी 6.09 पर्यंत सूर्यग्रहण दिसले. बहुतेक ठिकाणी सूर्यास्तानंतर ग्रहण संपले.
दरम्यान, ग्रहण काळात बेळगावकरांनी परंपरांची पाळणूक केली. अनेक ठिकाणी घरांच्या अंगणात हिंदू धार्मिक परंपरेप्रमाणे परातीत पाणी घालून किंवा थेट रस्त्यात मुसळ किंवा लाटणे उभे करून ठेवल्याचे दिसून आले


बेळगावातील कपिलेश्वर मंदिरात आज सूर्यग्रहणानिमित्त पाण्याने भरलेल्या परातीत मुसळ उभे करून ठेवण्याची परंपरा जोपासण्यात आली. फ्लो
ग्रहण काळात मुसळ किंवा लाटणे उभे करून ठेवण्याची प्रथा आहे. त्या प्रथेनुसार आम्ही घराच्या अंगणात मुसळ किंवा लाटणे उभे करून ठेवले आहे अशी माहिती नागरिकांनी दिली. त्याचप्रमाणे ग्रहण काळात काही खाऊ-पिऊ नये ही प्रथादेखील पाळल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदर यंदाच्या वर्षातील अखेरच्या सूर्यग्रहण काळात बेळगावात लोकांनी धार्मिक परंपरांचे पालन केल्याचे दिसून आले.

Tags:

belgaum solar eclipse