कन्नड साहित्य परिषदेचे संस्थापक सर मिर्झा इस्माईल यांची जयंती कसापच्या बेळगाव विभागाच्यावतीने आचरणात आणण्यात आली.
बेळगावमधील नेहरू नगर येथील कन्नड भवन येथे कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हा विभागाच्यावतीने स्व. मिर्झा इस्माईल यांच्या जयंतीचे आचरण करण्यात आले होते. यावेळी म्हैसूर नलवाडी कृष्णराज वडेयार, सर एम. विश्वेश्वरय्या आणि म्हैसूरचे सर इस्माईल मिर्झा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा महिला कदळी वेदिकेच्या अध्यक्षा प्रेमक्का अंगडी बोलताना म्हणाल्या, सर मिर्झा इस्माईल यांनी कन्नड साठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कन्नड साहित्य क्षेत्रात अनेक विकासकामे केली. त्यांचे योगदान हे संस्मरणीय असल्याचे त्या म्हणाल्या.
सर. इस्माईल यांच्या योगदानाबद्दल डॉ. एच. आय. तीम्मापुर यांनी व्याख्यान दिले. इस्माईल यांनी कन्नड साठी धर्मनिरपेक्षपणे काम केले. कन्नड ही प्रथम प्रशासकीय भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. जातीपलीकडे जाऊन लोकांना मदत करावी, असा संदेश सर इस्माईल यांनी दिला. तसेच कन्नडला प्राधान्य देत काम केले, यासह सर इस्माईल यांनी कन्नड भाषेसाठी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली.

धारवाड मध्ये सुरु झालेली कन्नड साहित्य परिषद बेंगळुरू पर्यंत जाऊन पोहोचली यात इस्माईल यांनी मोठे योगदान दिले आहे. असे कसाप जिल्हाध्यक्ष मंगला मेटगुड्ड म्हणाल्या
यावेळी चनगौडा पाटील, लेखिका संघाच्या अध्यक्षा जयशील ब्याकोड, भारती मठद, सुनील हलवाई, प्रकाश अवलक्की, सुरेश हांजी, शिवानंद तल्लुर, रमेश मगदूम, विरुपाक्ष दोडमनी, बी बी मठपती, श्रीरंग जोशी, डॉ. अडिवेश इटगी, यासह कसाप पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. जिल्हा सचिव एम वाय मेनसिनकाई यांनी स्वागत केले, राजेश्वरी हिरेमठ यांनी राज्यगीत गायिले तर सुधा पाटील यांनी आभार मानले. मल्लिकार्जुन कोळी यांनी सूत्रसंचलन केले.


Recent Comments