उसाला प्रतिटन 5,500/-रुपये दर देण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादकांनी सुरू केलेला संघर्ष आजही सुरू आहे. विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांच्या निधनामुळे आणि कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज सांकेतिक आंदोलन केले.
बेळगाव, मुडलगी आणि गोकाक तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज, रविवारी शहरातील कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे उसाला प्रतिटन 5500/- भाव मिळावा या मागणीसाठी निदर्शने केली. जय जवान-जय किसानचा नारा देत आपला आक्रोश व्यक्त केला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीसाठी संघर्ष सुरू ठेवल्याने त्यांना गप्प केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सौंदत्तीचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक आंदोलन केले. ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत गोड बातमी देणार असल्याचे साखर मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प यांनी सांगितले होते.
मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांची समजूत घातली आणि योग्य किंमत देऊ असे सांगितले. पण त्यांनी शब्द पाळला नाही. कित्तूर उत्सवात व्यत्यय न आणता आणि आनंद मामनी यांचा अनादर न करता आम्ही सांकेतिक पद्धतीने आमचे आंदोलन सुरू ठेवले आहे. 5500 रुपये दर शेतकऱ्यांना न दिल्यास तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा शेतकरी नेते श्रीशैल अंगडी यांनी दिला.
त्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात बेळगावसह मुडलगी आणि गोकाक तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.


Recent Comments