बेळगाव विमानतळाला वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचे नाव देण्यात यावे, यासाठी मंत्रिमंडळाची तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी कन्नड कार्यकर्ते श्रीनिवास ताळूकर यांनी केली आहे.
२००७ पासून सुमारे १७ वर्षे बेळगावच्या विमानतळाच्या नामांतरासाठी लढा देणाऱ्या श्रीनिवास ताळूकर यांनी पुन्हा एकदा विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे. बेळगाव विमानतळाला वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचे नाव देण्यात यावे, यासाठी मंत्रिमंडळाची तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा अशी मागणी श्रीनिवास ताळूकर यांनी केली आहे. बेळगाव विमानतळाला राणी चन्नम्मा यांचे नाव देण्यासाठी सुरु असलेल्या संघर्षाकडे सरकारने जाणीवपूर्वक कानाडोळा केला असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. शिमोगा येथील विमानतळाला माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला, विजापूर विमानतळाला बसवेश्वरांचे नाव देण्यात आले हे स्वागतार्ह आहे. याचप्रमाणे बेळगाव विमानतळाला देखील राणी कित्तूर चन्नम्मा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
याबाबत दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनीही आवाज उठविला होता. मात्र त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष झाले. कित्तूर उत्सवाच्या औचित्याने मंत्रिमंडळाची बैठक बोलावून बेळगाव विमानतळाला राणी चन्नम्मा यांचे नाव देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी श्रीनिवास ताळूकर यांनी केली.


Recent Comments