Belagavi

5500 रु. भाव जाहीर करूनच मुख्यमंत्र्यांनी कित्तूर उत्सवाला यावे : शेतकऱ्यांचा लकडा

Share

उसाला 5500 रुपये प्रतिटन भाव जाहीर करून मगच मुख्यमंत्री बोम्मई यांनी कित्तूर उत्सवाला यावे, अशी मागणी बेळगावच्या शेतकरी कार्यकर्त्यांनी केली आहे.

यासंदर्भात शनिवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या कर्नाटक राज्य रयत संघटना व हसीरु सेनेच्या नेत्यांनी पोलिसांच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांचा छळ करण्याचे काम केले. रात्री एक वाजेपर्यंत आमचा छळ करण्याएवढा काय मोठा गुन्हा आम्ही केलाय? कष्टाने पिकवलेल्या उसाला योग्य भाव मिळावा यासाठी आमची धडपड सुरू आहे. आम्हालाही राणी चन्नम्मा यांचा खूप अभिमान आहे. पण सीएम बोम्मयी यांनी उसाला साडेपाच हजार प्रतिटन भाव जाहीर करून मगच कित्तूर महोत्सवाला यावे अशी मागणी त्यांनी केली.

यावर बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी, 7 ऑक्टोबर रोजी जिल्हा पंचायत सभागृहात सर्व साखर कारखानदार, एमडी आणि साखर आयुक्त यांची एकाच व्यासपीठावर बैठक घेऊन चर्चा करून शेतकऱ्यांच्या विशेष मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी साखर मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरू येथे बैठक झाली. तसेच यापूर्वी एसएपीची बैठकही झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने दोन आठवड्यात तीन-चार राज्यस्तरीय मोठ्या बैठका झाल्या आहेत. मात्र, त्यांची मागणी पूर्ण होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यांच्या मागण्या संबंधित विभागापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी चुनाप्पा पुजारी, शिवानंद मुगळीहाळ आदी शेतकरी नेते उपस्थित होते.

Tags:

sugarcane-farmer-met-dc-nitesh-patil/