Belagavi

एचआयव्ही कायद्याबाबत जनजागृती करण्यात सरकार अपयशी : निशा गुरुर

Share

२०१७ चा एचआयव्ही प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा २०१९ मध्ये लागू झाला. मात्र या कायद्याचा वापर केला जात नाही. अद्याप जनतेला या कायद्याबाबत माहितीच नाही. एचआयव्ही कायद्याबाबत जनजागृती करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप संगम संस्थेच्या व्यवस्थापिका निशा गुरुर यांनी केला.

कन्नड साहित्य भवन येथे बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. एचआयव्ही प्रतिबंध कायदा अस्तित्वात आहे हे अद्याप लोकांना माहिती नाही. सरकार एचआयव्ही बाधितांकडे दुर्लक्ष करत आहे. एचआयव्ही रुग्णाने घेतलेली गोळी ही चांगल्या दर्जाची गोळी असते. मात्र त्यानुसार रुग्णांना पोषक आहार मिळत नाही. सरकारने गरीब एचआयव्ही रुग्णांना पौष्टिक आहार दिला पाहिजे. आणि या कायद्याबाबत जनजागृती झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बेळगाव जिल्ह्यात २१ हजार एचआयव्ही बाधित आहेत. त्याचप्रमाणे देशातील १ कोटीहून अधिक लोकांना एचआयव्ही आहे. एचआयव्ही कायद्याबाबत जनजागृती करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मात्र आम्ही संगम संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत. मतिमंद एचआयव्ही रुग्णाला मानसिक धैर्य देण्याचे काम केले पाहिजे, असे मत निशा गुरू यांनी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेला संगम संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

government-failed-to-create-awareness-about-hiv-act-nisha-gurur-alleges/