उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांसारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नावारूपाला आलेल्या मुलायम सिंह यांना आणीबाणीला विरोध केल्यामुळे तुरुंगवास भोगावा लागला. समाजवादी पक्षाची स्थापना करणारे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा काम करणारे मुलायम सिंह यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले. त्यांच्या निधनाने देशाने एक परोपकारी राजकारणी गमावला आहे.

त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना त्यांच्या शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी केली आहे.



Recent Comments