Banglore

एससी एसटी मठाधीशांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

Share

गेले अनेक दिवस राज्यात गाजत असलेल्या अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षण वाढीवर सरकारच्या निर्णयाने अखेर पडदा पडला आहे. एससी एसटी समाजाच्या विविध मठाधीशांनी आज एससी एसटी समाजाच्या आरक्षणात वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

बेंगळूर येथील मुख्यमंत्र्यांचे गृह कार्यालय कृष्णा येथे वाल्मिकी गुरु पीठाचे प्रसन्नानंद पुरी स्वामीजी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा मिठाई भरवून सत्कार केला. त्यांच्याशी विविध मठाधीशानी यावेळी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून आभार मानले.

यावेळी बोलताना वाल्मिकी गुरु पीठाचे प्रसन्नानंद पुरी स्वामीजी यांनी, सरकारने आरक्षण वाढ प्रश्नी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. हा धाडसी निर्णय घेऊन वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी बोम्मई यांचे अभिनंदन केले.

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. सर्वाना समान सामाजिक न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या सरकारची भूमिका आहे. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या वंचित समाज घटकांना न्याय मिळवून देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

यावेळी मादार चेन्नय्या स्वामीजी, इम्मडी सिद्धरामेश्वर स्वामीजी, हरिहर पंचमसाली पीठाचे वचनानंद स्वामीजी, मंत्री आर. अशोक, गोविंद कारजोळ, बी श्रीरामुलू, आनंद सिंग, शंकर पाटील-मुनेनकोप्प, आमदार राजु गौडा, रेणुकाचार्य आदी उपस्थित होते.

Tags: