Vijayapura

बसवण बागेवाडीत ४० बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचा मोर्चा

Share

विजापूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी तालुक्यातील नंदीहाळ पीयू गावातील बैलगाडीधारक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन केले.

गावातील सुमारे ४० बैलगाड्यांसह बसवेश्वर चौकातून मोर्चा काढत शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर ग्रेड-२ तहसीलदार सोमलिंग अरिकेरी यांना निवेदन सादर केले. बैलगाडीधारक शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या वेळी बोलताना अशोक हारिवाळ यांनी, सरकारने बैलगाडीधारक शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला.
या आंदोलनात बसवराज मनगूळी, अवण्णा हिरेकुरुबर, संतोष कुमुसी, बसवराज गच्चीनवर, शरणप्पा बेंकी, अनिल पवार यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते

Tags: