Belagavi

बेळगावात राष्ट्रीय वन हुतात्मा दिन गांभीर्याने

Share

देशातील वन आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी वन विभागाच्या जवानांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ 11 सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय वन हुतात्मा दिन पाळला जातो. बेळगावातही आज वनविभागाच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

11 सप्टेंबर 1730 रोजी जोधपूरचे महाराजा अभयसिंग यांच्या सैनिकांनी राजाच्या नवीन राजवाड्यासाठी केजर्ली परिसरात वाढणारी झाडे तोडण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करणाऱ्या बिष्णोई समाजातील 363 पुरुष, स्त्रिया आणि मुलांची राजाच्या सैनिकांनी क्रूरपणे हत्या केली. झाडे तोडण्यास विरोध करून वृक्ष संवर्धनासाठी बिष्णोईनी दिलेल्या बलिदानाची आणि त्यागाची आठवण म्हणून भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी बेळगावातील मुख्य वनसंरक्षक, वनविभाग, यांच्या कार्यालय परिसरात राष्ट्रीय वन शहीद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन, सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, डीएफओ डॉ. अँथनी मरियप्पा यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर केएसआरपी पोलिसांनी हवेत तीन राऊंड गोळीबार करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा न्यायाधीश मुस्तफा म्हणाले की, आपल्या देशाची सर्वात मोठी संपत्ती ही जंगल आहे. आपल्या देशाचे भविष्य या जंगलातील शांततेवर अवलंबून आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एवढी संपत्ती नजरेसमोर ठेवून स्वतःच्या जिवानिशी जपल्याबद्दल या कार्याचे कौतुक केले.

 

या वेळी बोलताना सीसीएफ मंजुनाथ चव्हाण म्हणाले की, चिखलमाती, झाडे, आणि पर्यावरणासाठी वनविभाग हा प्रारंभबिंदू आहे. वनसंवर्धनासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या वनविभागाच्या धाडसी जवानांचे आपण कौतुक करावे तितके कमी नाही. शंकर मुडलगी, बसरीकट्टी, हंपय्या, खानापुरी, रंगनगौडा आणि आमच्या विभागात काम करणाऱ्या अनेकांनी वन आणि वन्यपशूंच्या संरक्षणासाठी जीव गमावल्याची आठवण त्यांनी करून दिली.

 

जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच.व्ही व इतर शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Tags:

#belgaum forest day