Belagavi

चाणक्य सोसायटी आणि रोटरी क्लबतर्फे भव्य रक्तदान शिबिर

Share

बेळगाव येथील एसजीबीआयटी महाविद्यालयात चाणक्य एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेऊन रक्तदान केले. चाणक्य एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष नागराज पाटील आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले. या यशस्वी उपक्रमाबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते, महाविद्यालयाचे प्रशासन, प्राध्यापक वर्ग आणि सहकार्य करणाऱ्या संघांचे आभार मानले आहेत. नागरिकांमधूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Tags: