Gokak

पीएसआय परीक्षा घोटाळा प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी

Share

पीएसआय परीक्षा घोटाळा प्रकरण राज्यभरात सध्या चर्चेत आले असून या प्रकरणी अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला असून सदर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे असा आग्रह त्यांनी केलाय.

गोकाक शहरात हिल्स गार्डन कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले ,पीएसआय परीक्षा घोटाळा प्रकरणात अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा हात आहे. पीएसआय घोटाळ्यात पोलीस अधिकारी कितपत गुंतले आहेत? याचाही तपास घ्यावा. एकाच परीक्षा केंद्रात परीक्षा दिलेले विद्यार्थी पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, याप्रकरणी ब्लूटूथ चा वापर बेकायदेशीरपणे करण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशी दरम्यान उघडकीस आली असून याप्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सतीश जारकीहोळी यांनी केली.

पीएसआय घोटाळा प्रकरणात अनेक उच्च पदावर कार्यरत असणारे अधिकारी, मंत्री, आमदार यांची नावे पुढे आली आहेत. काल माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचेही नाव पुढे आले असून या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सात मे रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांच्यासह आपण देखील सहभागी होणार असल्याचे सतीश जारकीहोळी म्हणाले. केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार हे सात मे रोजी दुपारी तीन वाजता बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे विधान परिषद नैऋत्य पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बेळगाव शहर बेळगाव ग्रामीण चिकोडी विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Tags: