Belagavi

बेळगावात मास्कचा आदेश वाऱ्यावर !

Share

 कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने राज्यात मास्क अनिवार्य करण्याचा महत्वाचा आदेश जारी केला आहे. पण दाट लोकवस्तीच्या बेळगाव शहरात लोकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

होय, कोरोनाच्या चौथ्या संभाव्य लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांसाठी मास्क अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बेळगावच्या राणी चन्नम्मा सर्कल, गणपत गल्ली, रविवार पेठ अशा गरीच्या ठिकाणी या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. लोक मास्कशिवाय फिरत आहेत. बाजारातील विक्रेते व ग्राहकांनी शासनाचा हा नियम पायदळी तुडवला आहे. बेळगाव महानगरपालिकेनेही याबाबत जागृती करण्याकडे काणाडोळा केला आहे. गणपती गल्लीतील फुलांचे व्यापारी अरुणकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारने मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.तामिळनाडू आणि केरळमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह केसेस दिसत आहेत. सध्या बेळगावात तशी भीती दिसत नाही. तरीही आम्ही मास्क वापरला पाहिजे. लॉकडाऊन करून छोट्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही शासनाचे नियम पाळले पाहिजे.  एकंदर चौथी लाट राज्यात पुन्हा कधीही कहर करू नये. आमच्या इनन्यूजची इच्छा आहे की प्रत्येकाने मास्क घालून, सामाजिक अंतर राखून स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे.

 

 

Tags: