परमेश्वराचे स्मरण केल्यास सर्व संकटे दूर होतात, असे प्रतिपादन यरगोप्पा लीलामठाचे श्री शिवाप्पा आज यांनी केले.

बैलहोंगल तालुक्यातील नावलगट्टी येथे शनिवारी मारुती देवस्थान जत्रेनिमित्त रथोत्सव आयोजित करण्यात आला होता. रथाचे पूजन केल्यानंतर श्री शिवाप्पा आज बोलत होते.परमेश्वराचे स्मरण, जत्रा, परंपरा या कालानुरूप कमी होत चालल्या आहेत. तरुणांकडून होणाऱ्या पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे परंपरा सांगणे अवघड होत चालले आहे. प्राचीन काळी ऋषीमुनींनी तपश्चर्या आणि ज्ञानाने सर्व गोष्टी मिळवल्या होत्या. त्या काळात आराम नव्हता, पण उत्तम पीकपाणी होते, आनंद होता समाधान होते. मात्र सध्याच्या काळात परंपरांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मानवासह इतर सजीवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपली हिंदू संस्कृती खूप मोठी असून आपली परंपरा आपल्याला जपायची आहे, असे आवाहन श्री शिवाप्पा आज यांनी केले.
या यात्रेच्या निमित्ताने गावातील युवकांनी परिसरात भगव्या पताका लावल्या होत्या. वाद्यपथकाच्या माध्यमातून हनुमंताचा जयघोष करत पालखी उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी, बाबन्ना कल्लूर, गौडाप्पा नावलगट्टी, शिवनायक भावी, बसाप्पा मरेन्नावर,रायप्पा मूडलगी, रुद्राप्पा कल्लूर, लक्ष्मण यरगणवी, सिद्धय्या हिरेमठ, ग्राम पंचायत सदस्य शिवानंद कल्लूर, रवी कल्लूर, रेणुका यरगणवी, शांतावव उप्पारट्टी, दीपा मरेन्नावर, रुद्रगौडा पाटील, यल्लाप्पा उप्परट्टी, संतोष कल्लूर, बजरंग दल आणि आर एस एस कार्यकर्ते, पुलारकोप्प, हिरेमेळे, तिगडी, गिरियाल, के एस मॅरीकट्टी आणि गणिकोप्प आदी गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments