सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्याबाबत सोशल मीडियावर अवमानकारक टिपणी करणाऱ्या तालिबानी मानसिकतेच्या युवकाला राजस्थानातील टोंक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जवादखान (वय २१ वर्षे) असे त्याचे नाव आहे.
सीडीएस जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका व अन्य असा एकूण १३ जणांचा तमिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर जवादखानने, ‘जहन्नुममध्ये (नरक) पोहोचण्यापूर्वीच त्यांचा (जनरल रावत) जिवंत जळून मृत्यू झाला’ असा आक्षेपार्ह मजकूर रावत यांच्या फोटोसह सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्याची दखल घेत टोंक पोलिसांनी तातडीने अटक केली.
टोंक पोलिसांनी ट्विट करून या कारवाईची माहिती दिली आहे. जवादखान राज टॉकीजजवळ राहतो. त्याला पकडण्यासाठी ४ पथके स्थापन केली होती. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर तो तालिबानी मानसिकतेचा असल्याचे दर्शविणारी छायाचित्रे आणि संदेश सापडले आहेत.
Recent Comments