यंदाचा राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात यावा, असा निर्धार कन्नड संघटनांनी केला होता. परंतु पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनामुळे साऱ्यावर पाणी फेरले. परंतु पुनीत राजकुमार यांच्या कन्नड गाण्यावर चन्नम्मा चौकात त्यांच्या चाहत्यांनी जोरदार नृत्य केले.

व्हॉइस : बेळगावमध्ये गेल्या वर्षी कोरोनामुळे राज्योत्सव साधेपणात साजरा करण्यात आला. यंदाचा राज्योत्सव भव्य प्रमाणात करण्याची योजना आखण्यात आली. परंतु पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे यंदाचा राज्योत्सव साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान रविवारी रात्री काही कन्नड भाषिक युवक आणि युवतींनी कन्नड ध्वज हातात घेऊन चन्नम्मा चौकात घोषणा देण्यास सुरुवात केली. पुनीत राजकुमार यांचे छायाचित्र हाती घेऊन पुन्हा हे युवक आणि युवती सोमवारी सकाळी चन्नमा चौकात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

चार तास झाले तरीही हे युवक आणि युवती थांबण्यास तयार नव्हते. त्यामुळे याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच चन्नम्मा चौकातील गर्दी देखील पोलिसांनी पांगविली.
एकंदरीत भव्य प्रमाणात राज्योत्सव आचरणात आणण्याची कन्नड संघटनांची इच्छा पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे पूर्ण होऊ शकली नाही. पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.


Recent Comments