Belagavi

खादी हे देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक : जिल्हाधिकारी

Share

खादीचे कपडे हे देशाच्या स्वाभिमानाचे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील प्रेमाचे प्रतीक आहे असे विचार जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी मांडले.

बेळगावात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात खादी आणि ग्रामोद्योग खात्याच्या खादी आणि वस्तू प्रदर्शनाला भेट देऊन स्वतः खरेदी करून उदघाटन केल्यावर ते बोलत होते.

मानवी शरीरासाठी खादीचे कपडे वापरणे चांगले आहे. शांती व सौहार्दाचे प्रतीक आणि देशाभिमानाचे द्योतक म्हणून खादीला स्वातंत्र्य चळवळीपासून ओळखले जाते. उन्हाळ्यात खादीचे कपडे वापरणे चांगले असते. त्यामुळे खादी आणि स्वस्तात मिळणाऱ्या कापसाच्या वस्तू, ग्रामोद्योगातून उत्पादित साहित्य जनतेने विकत घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी खादी- ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा अधिकारी के. एम. कुंबार, अधीक्षक रामकृष्ण ढवळेश्वर तसेच हुदली खादी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Tags: