Belagavi

बीम्स इस्पितळात नव्या आयसीयूचे उदघाटन

Share

बेळगाव जिल्हा बीम्स इस्पितळातील नव्या अतिदक्षता विभागाचे इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे चेअरमन डॉ. देवप्रसाद चट्टोपाध्याय यांच्याहस्ते शुक्रवारी उदघाटन करण्यात आले.

बेळगाव जिल्हा बीम्स इस्पितळाकडून कोरोना काळात समर्पक उपचार दिले जात नसल्यावरून मोठी टीका झाली होती. मात्र आता बीम्स इस्पितळ टप्प्याटप्प्याने कात टाकू लागले आहे. शुक्रवारी बीम्समधील आयसीयूचे उदघाटन आयसीएमआरचे चेअरमन डॉ. देवप्रसाद चट्टोपाध्याय यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर बोलताना त्यांनी या नव्या आयसीयूचा गोरगरीब रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करून बीम्सचे डॉक्टर्स आणि कर्मचारी चांगले काम करत आहेत. त्यांनी पुढेही ते सुरु ठेवावे अशा शुभेच्छा दिल्या.

 त्यानंतर नव्या आयसीयूची माहिती देताना बीम्सचे संचालक डॉ. राजू विवेकी म्हणाले, नव्या आयसीयूत १० व्हेंटिलेटर बेड्स आहेत. तसेच अत्याधुनिक उपकरणे आहेत. टप्प्याटप्प्याने बीम्स इस्पितळात सुधारणा घडवून आणत आहोत. त्यासाठी सर्वानी सहकार्य द्यावे असे आवाहन केले.

याप्रसंगी डॉ. अण्णासाहेब पाटील, बाईम्च्या सीईओ अफ्रिन बानू बळ्ळारी, डॉ. निंबाळ, डॉ. गिरीश दंडगी आदी उपस्थित होते.

Tags: