स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीत बेळगाव शहर कर्नाटकात दुसऱ्या क्रमांकावर असून ते पहिल्या क्रमांकावर यावे ही आमची इच्छा आहे. यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करण्यास सज्ज आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

रविवारी बेळगावातील शहापूरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ २.५ कोटी रुपये खर्चातून उभारलेल्या रवींद्र कौशिक डिजिटल लायब्ररीचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी फित कापून उदघाटन केले. शिवाजी गार्डनजवळ याआधी महागरपालिकेचे ग्रंथालय होते. त्याचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करून जुनी इमारत पाडून त्याठिकाणी या भागाचे लोकप्रिय आ. अभय पाटील यांनी ४-कि, ५-जी काळाला अनुरूप डिजिटल ग्रंथालय निर्माण केले आहे. या ठिकाणी मराठी, कन्नड, इंग्लिश, हिंदी आणि उर्दू या ५ भाषांत वाचनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मुद्रित आणि डिजिटल स्वरूपातील पुस्तके असणारे हे बेळगावातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय ठरले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ग्रंथालयात सर्व सेवा मोफत दिल्या जाणार आहेत. स्मार्ट डिजिटल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा वापर, वाय फाय सुविधेसह २३ संगणक, ५ टॅब येथे उपलब्ध केले आहेत. इच्छुकांना येथे बसून वाचन करता येईल किंवा हवी ती पुस्तके डाउनलोड करून घेता येतील. डिजिटल आणि शिकण्यासाठीची उपकरणे येथे आहेत. 

देशात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आपली युवावस्थेत २६ वर्षे खर्च केलेल्या रवींद्र कौशिक यांचे नाव या ई-ग्रंथालयाला देऊन आ. अभय पाटील यांनी त्यांचे नाव अमर केले आहे. यावेळी रवींद्र कौशिक यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला.
ग्रंह्टल्याचे उदघाटन करून बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, अभिमान वाटावा असा आजचा दिवस आहे. रवींद्र कौशिक यांच्या साहसी जीवनाची आठवण आपण ठेवली पाहिजे. वाचक आणि लेखकांना या डिजिटल लायब्ररीने एक उत्तम संधी प्राप्त करून दिली आहे. अभय पाटील जे काही करतात ते नेहमी विशेष करतात असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आ. अभय पाटील यांची प्रशंसा केली.
बेळगावातील लोक कन्नड आणि देशाविषयी अभिमान बाळगणारे आहेत. येथे संकुचित भावनेला स्थान नाही हे त्यांनी पालिका निवडणुकीत दाखवून दिले आहे. नगरसेवकांवर आता मोठी जबाबदार आहे. बेळगावात डबल इंजिन सरकार आहे. अभय पाटील आणि अनिल बेनके हे दोघे डबल इंजिन असल्यासारखे आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आमदारांची प्रशंसा केली. बाईट याप्रसंगी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, वनमंत्री उमेश कत्ती, नगरविकास मंत्री बसवराज भैरत्ती, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण बागेवाडी, पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments