Belagavi

देव आणि भक्तांची आता थेट भेट ! जिल्ह्यातील देवस्थाने खुली

Share

सौंदत्ती यल्लम्मा, चिंचली मायाक्का, बडकुंद्री होळेम्मा आणि मंगसुळी मल्लय्या देवस्थानात भक्तांना सशर्त परवानगी देण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

 

होय, कोरोनामुळे गेले काही महिने बेळगाव जिल्ह्यातील सर्व देवस्थानांत भक्तांना दर्शनासाठी प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र हल्ली कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने देवस्थाने दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी भक्तांतून करण्यात येत होती.

त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारच्या परवानगीने सौंदत्ती यल्लम्मा, चिंचली मायाक्का, बडकुंद्री होळेम्मा आणि मंगसुळी मल्लय्या देवस्थानात भक्तांना सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाने कोविड मार्गसूचीचे पालन करत देवस्थानात दर्शन घेण्याचे आवाहन भक्तांना केले आहे.

 

Tags: