Vijayapura

विहिरीत आढळला दोन वर्षांच्या मुलीसह आईचा मृतदेह

Share

दोन वर्षांच्या मुलीसह आईचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना रायबाग तालुक्यातील देवापुरहट्टी येथे उघडकीस आली. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

रायबाग तालुक्यातील देवापुरहट्टी गावात ३८ वर्षीय महिलेचा आणि तिच्या २ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. रुक्मव्वा हळींग असे महिलेचे तर अन्विता असे तिच्या मुलीचे नाव आहे. या महिलेने मुलीसह आत्महत्या केली की, त्यांना मारण्यासाठी कोणी विहिरीत ढकलून दिले हे स्पष्ट झालेले नाही. रायबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

 

 

Tags: