लाखो भाविकांचे व शेतकरी वर्गाचे श्रद्धास्थान म्हणून खास करून पंढरपूरकडे पाहिले जाते. मात्र मागील वर्षापासून पंढरपूर आषाढी एकादशी वारी ला कोरोनाचे मोठे ग्रहण लागल्यामुळे आपल्या शेतकरी वर्गातील वारकरी मंडळींना पंढरीच्या विठुरायाचे दर्शन मिळणे जवळपास दुर्मिळच झाले आहे. कोरोनाच्या रोगराईने संपूर्ण जगाला त्रासले असून यामुळे लाखो भाविकांची श्रद्धास्थाने अजूनही काही प्रमाणात बंद आहेत व त्याचा फटका देखील पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरलादेखील बसला आहे,


त्यामुळे बेळगाव तालुक्यातील राजहंसगड गावातील वारकऱ्यांनी कोरोना काळात उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पारायण कमिटी वारकर्यांनी आज गावांमध्ये पायी दिंडी काढून गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दोन दिवसाच्या मुक्कामासाठी स्थायिक झाले. आज मंदिरा मध्येच मुक्काम करून उद्या मंगळवार रोजी आषाढी एकादशी भजन सोहळा करून बुधवारी द्वादशी करून दुपारनंतर म्हमत्याचा कार्यक्रम करून या वर्षीची आषाढी एकादशी गावातच करून प्रशासनाला एक प्रकारे सहाय्य केल्यामुळे राजहंसगडच्या वारकऱ्यांची प्रशंशा केली जात आहे.
तत्पूर्वी आज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पारायण कमिटी वारकऱ्यांनी गावातील काही प्रतिष्ठित लोकांचा मंदिरासमोर सत्कार सोहळा करून दिंडी सोहळ्याची पूजा करून गावांमध्ये दिंडी मार्गस्थ झाली या समयी सुळगे (ये) ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ. गंगवा सिद्धाप्पा नाईक व उपाध्यक्ष श्री दत्ता ज्योतिबा पवार माजी तालुका पंचायत सदस्य श्री सिद्धाप्पा छत्रे, बाळू इंगळे, सिद्धाप्पा नाईक, सौ. लक्ष्मी रामचंद्र गडकरी, सौ. ज्योती मारुती इंगळे, हनमंत नावेकर, भाऊराव पवार या सर्वांचा सत्कार करून यांच्या हस्ते दिंडीला सुरुवात करण्यात आली.


Recent Comments