hubali

गब्बूर जैन मंदिरातील चोरीप्रकरणी राजस्थानमधील दोघांना अटक

Share

हुबळीतील गब्बूर येथील जैन मंदिराचे प्रवेशद्वार तोडून दानपेटी फोडत लाखो रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या दोघांना बेंडीगेरी पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पापिन आणि रवी कुमार अशी आहेत.

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील बीमन गावातील रहिवासी असलेल्या या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला. त्यातून आरोपींचा माग काढत पोलिसांनी राजस्थानमधून दोघांना ताब्यात घेत हुबळीला आणले.

एसीपी चिक्कमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बेंडीगेरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. आर. नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पीएसआय रवी यांच्यासह हनुमंत, बसू, चंद्रू आणि अमर यांनी या तपासात सहभाग घेतला.

आंतरराज्य चोरीप्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केल्याबद्दल हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बेंडीगेरी पोलिसांचे कौतुक केले.

Tags: