hubali

जुनी हुबळीत मालमत्तेच्या वादातून पुतण्याकडून चुलत्याची चाकूने भोसकून हत्या

Share

जुनी हुबळीतील मेहबूबनगर बानतिकट्टा येथे मालमत्तेच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पुतण्याने चुलत्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली.

अन्वर खान पठाण (४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे मोठे भाऊ अजगर यांचा मुलगा सिराज खान पठाण याने त्यांच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

दोन्ही भावांची कुटुंबे एकाच इमारतीत राहत होती. घराच्या वाटणीवरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी सायंकाळी घरासमोर सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सिराजने अन्वर यांच्या पोटावर चाकूने वार केल्याचे समजते.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अन्वर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी किम्स रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी जुनी हुबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Tags: